सेरेनाचे स्वप्न भंगले; ओसाका अंतिम फेरीत

सेरेना विल्यम्सचे (Serena Williams) विक्रमी 24 व्या ग्रँड स्लॅम अजिंक्यपदाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. अलीकडच्या काळातील तिची कट्टर प्रतिस्पर्धी जपानची नाओमी ओसाका (Naomi Osaka) हिने ऑस्ट्रेलियन ओपनच्या (Australian Open) उपांत्य फेरीत तिचे आव्हान संपवले. ओसाकाने अंतिम फेरीत धडक मारताना ६-३, ६-४ असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदासाठी ओसाकाचा सामना आता अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडी (Jennifer Brady) हिच्याशी होईल. पहिल्यांदाच ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत पोहचलेल्या जेनिफरने उपांत्य सामन्यात झेक खेळाडू कॕरोलिना मुचोव्हा हिच्यावर ६-४, ३-६,६-४ असा विजय मिळवला.

ओसाका चौथ्यांदा ग्रँड स्लॅमच्या फायनलमध्ये पोहचलेली असून दरवेळी ग्रँड स्लॅमची फायनल ती जिंकलीच आहे. २०१८ ची यूएस ओपन, २०१९ ची ऑस्ट्रेलियन ओपन आणि २०२० ची यूएस ओपन तिने जिंकली आहे.

२०१८ च्या यूएस ओपनच्या लढतीत तिने सेरेना विल्यम्सला पराभवाचा धक्का दिला होता. गेल्या १० ग्रँड स्लॅम स्पर्धांपासून सेरेनाचे २४ व्या स्लॅम अजिंक्यपदाचे स्वप्न अधुरे राहात आहे. या वेळच्या पराभवानंतर सेरेनाला पत्रकार परिषदेत रडू कोसळले. सेरेना पहिल्यांदाच मेलबोर्न पार्कच्या कोर्टवर उपांत्य फेरीत पराभूत झाली. ओसाकाचा हा सलग २० वा विजय ठरला.

गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीपासून एकही सामना न गमावलेली ओसाका म्हणाली की, सुरुवातीला मी काहीशी नर्व्हस व तणावात होते; पण नंतर सहज खेळ झाला. बऱ्याच दिवसांनंतर पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर खेळताना मजा आली. सेरेनाशी खेळायला मिळणे हा सन्मान आहे आणि मी माझी सर्वोत्तम कामगिरी केली. मी लहान असल्यापासून सेरेना खेळताना बघत आली आहे. त्यामुळे तिच्याशी सामना खेळायला मिळणे ही एकप्रकारे स्वनपूर्ती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER