शेयर बाजारात तेजी ; सेंसेक्स 31,749 अंकावर

sensex-

नवी दिल्ली :- देशात कोरोनाने थैमान घातले आहे. मात्र दुसरीकडे केंद्र सरकारने काही विशेष क्षेत्रात लॉकडाऊन शिथिल केले. त्याचा परिमाण म्हणजे शेयर बाजार तेजी आल्याचे पाहायला मिळाले. सोमवारच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स 160.41 अंक वाढून 31,749.13 वर पोहोचला. निफ्टी 45.50 pts 9,312.25 वर प्रगतीवर आहे.

आज बीएसईमध्ये सुरुवातीलाच अनेक कंपन्यांना नफा झाला. तसेच यात जवळपास २९ कंपन्या अश्या आहेत ज्यांचे दर नाही वाढले आणि नाही कमी झाले.

निफ्टीतही उसळी पाहायला मिळाली. बाजार सुरू होताच निफ्टी 9,301.35 अंकांसह उघडला.


Web Title : Sensex rises 160. 41 pts to 31749 .13 in opening session

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)