सेन्सेक्स ४०० अंकांनी उसळला

sensex-raise-400-points-in-early-morning-trade

मुंबई : दिल्ली निवडणुकीचे निकाल आणि जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांनी आज गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात जोरदार खरेदी केली. चौफेर खरेदीने मंगळवारी सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४०० अंकांनी उसळला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत १२५ अंकांची वाढ झाली आहे.

आज सकाळीच आशियातील इतर शेअर बाजारात तेजी दिसून आली. सिंगापूरचा शेअर बाजार ४४ अंकांनी वधारला. तसेच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारात तेजी आहे. अजूनही बड्या कोर्पोरेट्सचे तिमाही निकाल जाहीर होत आहेत. आज कोल इंडिया आणि भेल या दोन सार्वजनिक कंपन्यांचे निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान, डीमार्टची प्रमुख कंपनी असलेल्या अव्हेन्यू सुपर मार्केट्सच्या शेअरने सोमवारी १.५ लाख कोटींचा बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडला. काल अव्हेन्यू सुपर मार्केट्सचा शेअर ८ टक्क्यांनी वधारला होता.

स्लो सॉफ्टवेरसाठी अ‌ॅप्पलला २५ मिलियन डॉलर्स दंड