मुहूर्त ट्रेडिंग : नव्या वर्षाची दणक्यात सुरुवात; सेन्सेक्स-निफ्टीचा मुहूर्ताला नवा रेकॉर्ड

Sensex Stock Market

मुंबई : मुहूर्ताला सेन्सेक्स आणि निफ्टीने दणक्यात सुरुवात केली आहे. मुहूर्ताचे सौदे सुरू होताच सेन्सेक्सने ३६५ अंकांची झेप घेतली आहे. तो ४३७०९ अंकांवर आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८१ अंकांनी वधारला असून १२८०१ अंकावर आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी आता रेकॉर्ड स्तरावर आहेत. संध्याकाळी ७.१५ वाजता बाजार बंद होताना सेन्सेक्स १५३ अंकांनी वधारून ४३५९६ अंकांवर बंद झाला. निफ्टी ५१ अंकांनी वधारून १२७७० अंकांवर बंद झाला.

दिवाळीच्या दिवशी स्टॉक मार्केट बंद असले तरी, मुहूर्त ट्रेडिंग सेशन्स जवळपास एक तासासाठी सुरू राहते. मुहूर्त ट्रेडिंगची वेळ दरवर्षी बदलत राहते. त्या दिवसातील शुभ समजल्या जाणा-या वेळेनुसार, ही वेळ ठरवली जाते. व्यापारी समुदाय जवळपास निम्म्या शतकापेक्षा जास्त काळापासून ही परंपरा पाळत आहेत. १९५७ पासून बीएसई हे विशेष ट्रेडिंग सेशनचे आयोजन करत आहे. त्यानंतर १९९२ पासून एनएसईद्वारे याचे आयोजन होत आहे.

मागील सत्रातील नफावसुलीतून सावरलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीने शुक्रवारी मात्र सकारात्मक शेवट केला. दिवसभरात ५०० अंकांचा चढउतार अनुभवणारा सेन्सेक्स ८५ अंकांच्या वाढीसह ४३४४३ अंकावर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २९ अंकांच्या वाढीसह १२७१९ अंकावर बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीने संवत्सर २०७६ या सरत्या वर्षाला तेजीने निरोप दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER