शेअर बाजारात पुन्हा घसरण; ४६४ अंकांची आपटी

Sensex

मुंबई : आज बुधवारी शेअर बाजार ४०० अंकांपेक्षा जास्तने कोसळला. २९६०२.९४ ची पातळी गाठली होती. निफ्टी ८,७८२.७० वर घसरला होता.

आज एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्सची घसरण झाली. ऍक्सेस बँकेच्या शेअरची सर्वाधिक म्हणजे तीन टक्के घसरण झाली. रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, आयटीसी आणि इंडसइंड बँकेचे शेअर्सही घसरले. त्याच वेळी सन फार्मा, एचयूएल आणि एचडीएफसीचे शेअर्स तेजीत होते.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या साथीमुळे शेअर बाजार अस्थिर आहे. घसरणीला लागला आहे; मात्र काल तो एका दिवसात १२०० अंकांनी उसळला होता. आज बाजाराची सुरुवातच घसरणीने झाली होती.