सलून व्यावसायिक पॉसिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने खळबळ

salon professional

कोल्हापूर :- पन्हाळा तालुक्यातील आंबवडे येथील पॉझिटिव्ह तरूण करवीर तालुक्यातील निगवे दुमाला येथील सलुन दुकानदाराच्या संपर्कात आला आहे. या दुकानदाराचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला असल्याने निगवेकरांची धाकधूक वाढली आहे. दक्षता म्हणुन ग्रामपंचायतीने निगवे दुमाला गाव संपूर्ण लॉकडाऊन केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, आंबवडे येथील त्या तरूणाचे वडील मुंबईहून आले होते. त्यांचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे. तो तरुण वडीलांच्या संपर्कात आला असल्याने त्याचाही स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता. त्यानंतर २६ जून रोजी तो तरुण व त्याचा मित्र निगवे दुमाला येथील सलुन दुकानात केस, दाढी करून गेले आहेत. तर सलुन दुकानदारांने नवीन घर बांधले आहे. घर पहाण्यासाठी एका मोटारसायकल वरून ते फिरले आहेत. सुमारे दोन ते अडीच तास ते एकमेकांच्या संपर्कात होते. आंबवडेतील तरुणाचा कोरोना रिपोर्ट २८ जूनला पाॅझिटीव्ह आला आहे. त्यामुळे तो तरुण सलुन दुकानदारांच्या संपर्कात आल्यामुळे निगवे दुमाला येथे खळबळ उडाली आहे. सलुन दुकानदारांचा स्वॅब २९ जून रोजी तपासणीसाठी पाठवला आहे. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER