पोलीस अधिकाऱ्याकडे सापडली ७० कोटींची संपत्ती !

हैद्राबाद : तेलंगणामधील सहायक पोलीस आयुक्त येळमाकुरी नरसिंह रेड्डी (Narasimha Reddy) यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे. रेड्डी यांच्याशी संबंधित संपत्तीचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी धाडी टाकल्यानंतर त्यांची सुमारे ७० कोटींची संपत्ती असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रेड्डी हे राकोकोंडा पोलीस आयुक्तालय अंतर्गत मलकाजगिरी विभागात तैनात आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेड्डी यांच्या संपत्तीचे मूल्य सरकारी मूल्यांकनानुसार फक्त साडेसात कोटी असले तरी तिचे बाजारमूल्य सुमारे ७० कोटी रुपये आहे.

रेड्डी यांच्या संपत्तीचा शोध घेण्यासाठी हैदराबाद, वारंगल, जानगाव, नलगोंडा, तेलंगणाच्या करीमनगर जिल्हे आणि आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात २५ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्यात. अनंतपूर येथे त्यांची ५५ एकर शेती, १९६० चौरस यार्डचे चार प्लॉट, मध्यपूर्व येथे दोन प्लॉट, हफिजपेठ येथे व्यापारिक संकुल, दोन घरे, १५ लाख रुपये रोख, दोन लॉकर सापडले आहेत. अजूनही तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER