
चंद्रपूर :- ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय बाबा आमटे यांची नात आणि वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विष घेत आत्महत्या केली आहे. आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरलं आहे. (DR. Sheetal Aamte Commit suicide)
मिळालेल्या माहितीनुसार, शीतल यांनी आनंदवन येथील राहत्या घरी विषाचे इंजेक्शन घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्त्यानंतर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. पण त्यापूर्वी शीतल यांची प्राणज्योत मालवली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला