ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. रोहिणी गोडबोले यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

AJit Pawar & Rohini Godbole
  • महाराष्ट्रकन्येच्या कामगिरीनं देशाची मान उंचावली – अजित पवार, उपमुख्यमंत्री

मुंबई :  पदार्थविज्ञान क्षेत्रातील मूलभूत संशोधन तसेच समाजात विज्ञानवादी दृष्टिकोन वाढीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल ज्येष्ठ शास्त्रज्ञ ‘पद्मश्री’ डॉ. रोहिणी गोडबोले (Rohini Godbole) यांना फ्रान्स सरकारचा प्रतिष्ठेचा ‘ऑड्रे नेशन डू मेरिट’ तथा ‘नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट’ हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. पुण्याची सुपुत्री, महाराष्ट्राची कन्या असलेल्या डॉ. रोहिणीताईंच्या कामगिरीनं देशाची मान उंचावली असून त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन अधिकाधिक युवक-युवती मूलभूत विज्ञान क्षेत्रातील संशोधनाकडे वळतील.

देशात विज्ञानवादी दृष्टिकोन वाढीस लागेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणाले की, भारत आणि फ्रान्स यांच्यातील संयुक्त संशोधन प्रकल्पांमध्ये डॉ. रोहिणीताईंनी मोलाचं योगदान दिलं आहे.

समाजात विशेषत: महिलांमध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन, संशोधनात्मक वृत्ती विकसित होण्यासाठी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांचा गौरव यापूर्वीच ‘पद्मश्री’ पुरस्कारानं झाला आहे. त्यांना नुकत्याच मिळालेल्या ‘नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट’ पुरस्कारानं त्यांच्या गुणवत्तापूर्ण कामगिरीवर शिक्कामोर्तब झालं आहे. डॉ. रोहिणीताईंपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्राच्या मुलींनी अशीच जीवनाच्या विविध क्षेत्रात उंच भरारी घ्यावी, अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER