काँग्रेसला धक्का : पक्षनेतृत्वावर आगपाखड करत केरळमधील ज्येष्ठ नेत्याचा राजीनामा

P. C. Chacko

नवी दिल्ली : केरळमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर टाकला आहे. आणि अशातच केरळमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि गांधी परिवाराचे अत्यंत विश्वासू राहिलेले पी. सी. चाको (P. C. Chacko) यांनी काँग्रेस (Congress) पक्षाला रामराम ठोकला. चाको यांनी आज राजीनाम्याची घोषणा केली.

मिळालेल्या माहितीनुसार चाको यांनी पक्षाच्या प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. चाको यांनी केरळ काँग्रेसमध्ये असलेल्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून राजीनामा देत असल्याचं स्पष्ट केलं. पक्षांतर्गत गटबाजीबाबत आपण पक्षनेतृत्वाला कळवून थकलो आहोत. केरळ काँग्रेसमध्ये जे काही सुरू आहे, त्याबाबत पक्षनेतृत्व फक्त बघ्याची भूमिका घेत आहे, अशी खंतही चाको यांनी बोलून दाखवली आहे. विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर चाको यांचा राजीनामा काँग्रेससाठी मोठा झटका मानला जात आहे.

गांधी परिवार हा देशातील पहिला परिवार असल्याचं सांगत दोन वर्षांपूर्वी चाको यांनी वाद ओढवून घेतला होता. त्यावेळी देशपातळीवर चाको यांच्यावर मोठी टीका झाली होती. भाजपने (BJP) तर चाको हे गांधी परिवाराची चाटूगिरी करण्यातच धन्यता मानत असल्याचं टीकास्त्र डागलं होतं. आता मात्र त्यात गांधी परिवाराच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत चाको यांनी राजीनामा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER