ज्येष्ठ क्रिकेटपटू भागवत चंद्रशेखर दवाखान्यात

भारताच्या गाजलेल्या फिरकी चौकडीतील महत्त्वाचे शिलेदार भागवत चंद्रशेखर (BS Chandrasekhar) यांना बंगळुरु येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता कक्षात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कर्नाटक क्रिकेट संघटनेचे प्रवक्ते विनय मृत्युंजय (Vinay Mrityunjay) यांनी दिली आहे.

त्यांच्या पत्नी संध्या चंद्रशेखर यांनी दिलेल्या माहितीनुसार ते व्यवस्थित होते आणि सामना बघत होते पण अचानक त्यांना खूप थकवा जाणवायला लागला आणि त्यांना बोलणे अवघड जाऊ लागले म्हणून आम्ही त्यांना दवाखान्यात दाखल केले. ते व्यवस्थित असून बहूधा दोन दिवसात त्यांना सुटी मिळेल असेही संध्या यांनी म्हटले आहे.

गेल्या काही महिन्यात माजी कर्णधार व अष्टपैलू कपिल देव आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगूली या दोघांनाही दवाखान्यात दाखल करण्यात आले होते आणि दोघांवरही अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER