मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांचा भाजपत प्रवेश

Capture222

मुंबई :-  काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपत प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. निष्ठेने वागायचं असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही, असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी मोदी सरकारच्या धाडसी निर्णयांचं कौतुकही केलं आहे.

“मी कोणतीही अट घालून भाजपत आलेलो नाही” असंही हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन पाटील यांनी एक मेळावा घेऊन पक्षावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्याच मेळाव्यात त्यांनी भाजपत प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले होते. या मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबीयांवर टीका केली आहे.

हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसच्या कार्यकाळात मंत्री होते. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच आताही कॉंग्रेस आणि भाजपचे अनेक नेते भाजप आणि सेनेच्या वाटेवर आहेत.

त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप –सेना युतीची ताकद वाढत आहे. तर काँग्रेस -राष्ट्रवादी कमकुवत होताना दिसत आहे.