सीताराम येचुरी यांच्या मुलाचे आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए. के. वालिया यांचे कोरोनाने निधन

Maharashtra Today

नवी दिल्ली : देशात कोरोना (Corona)विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन चिंता वाढवणारा असून, मृत्युसंख्या झपाट्याने वाढली आहे. आता दिल्लीचे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पूर्व मंत्री अशोककुमार वालिया (A. K.Walia) यांचे तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेते सीताराम येचुरी(Sitaram Yechury) यांच्या मोठ्या मुलाचेही कोरोनाने निधन झाले आहे. माकप नेते सीताराम येचुरी यांचा मोठा मुलगा आशिष येचुरी यांचे कोरोनावरील उपचारांदरम्यान गुरुवारी सकाळी निधन झाले. आशिष यांच्यावर गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सीताराम येचुरी यांनी ट्विटरवरून पुत्रनिधनाची दुःखद बातमी दिली.

मी अत्यंत दुःखाने कळवू इच्छितो, की माझा मोठा मुलगा आशिष येचुरी याचे आज सकाळी कोरोनामुळे निधन झाले. आशिषवरील उपचारादरम्यान आमच्या मनात आशेचा किरण जागवणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही आभार मानतो. डॉक्टर, नर्स, फ्रंटलाईन आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि आमच्या पाठीशी उभे राहिलेले असंख्य जण, अशा आशयाचे ट्विट  सीताराम येचुरी यांनी केले आहे. ३४ वर्षीय आशिष येचुरी हे व्यवसायाने पत्रकार होते.

राजधानी दिल्लीतील एका आघाडीच्या वर्तमानपत्रात ते सिनिअर कॉपी एडिटर म्हणून कार्यरत होते. दुसरीकडे दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात ए. के. वालिया यांनी अखेरचा श्वास घेतला. ते कोरोना विषाणूंविरुद्ध तीन दिवस लढत होते. डॉ. अशोककुमार वालिया हे सलग चार वेळा आमदार राहिले आहेत. त्यांनी शीला दीक्षित यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम केले. त्यांनी आरोग्य, नगरविकास, जमीन आणि बांधकाम विभाग यांचा कार्यभार संभाळला आहे.

ही बातमी पण वाचा : देशात ऑक्सिजनची कमी; देवानंद गॅस प्रा. लिमिटेडसह MG मोटर्सची भागीदारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button