१ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोफत लस; प्रकाश जावडेकर यांची माहिती

Senior citizens to get free vaccine from March 1-Prakash Javadekar

१ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांना (Senior citizens) लस (Free vaccine) देण्यात येणार, अशी घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. यात ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिक तसेच इतर व्याधी असणाऱ्या ४५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्या नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. १० हजार सरकारी आणि २० हजार खासगी केंद्रांवर ही लसीकरण मोहीम पार पडणार. तसेच ही लस मोफत दिली जाणार आहे. याचे सर्व खर्च केंद्र सरकार उचलणार. अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, “ज्यांना खासगी रुग्णालयातून लसीकरण करून घ्यायचे आहे त्यांना पैसे भरावे लागतील. यासाठी किती पैसे द्यावे लागेल, याचा निर्णय आरोग्य मंत्रालय पुढील तीन ते चार दिवसांत घेईल. आरोग्य मंत्रालयाची यासंबंधी रुग्णालये आणि लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांसोबत चर्चा सुरू आहे. ”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER