ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक जागृती दिनानिमित्त कार्यक्रम

Senior Citizens Harassment Prohibition Prevention Day

मुंबई : ज्येष्ठ नागरिक धोरणातील तरतुदीनुसार 15 जून हा दिवस ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जागृती दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग आणि हेल्पेज इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे आयोजन ऑडीटरम हॉल, विद्यालंकार इन्स्ट‍िट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, संगमनगर, वडाळा (पूर्व) येथे आज सकाळी १०.३० वाजता करण्यात आले आहे.

या चर्चासत्राचे उद्‌घाटन सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास मुंबई शहरचे पालकमंत्री सुभाष देसाई, सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार राहुल शेवाळे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, जनसंपर्क मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, समाजकल्याण विभागाचे आयुक्त मिलिंद शंभरकर, प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण मुंबई विभागाचे बाळासाहेब सोळंकी, हेल्पेज इंडियाचे प्रकाश बोरगावकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.