ज्येष्ठ सिने पत्रकार आणि लेखिका ललिता ताम्हणे यांचे निधन

senior-cine-journalist-writer-lalita-tamhane-passed-away

मुंबई :- ज्येष्ठ सिने पत्रकार आणि लेखिका ललिता ताम्हणे यांचे  दीर्घ आजारामुळे वयाच्या ६० व्या वर्षी ठाण्यात दुःखद निधन झाले. लोकसत्ताच्या लोकमुद्रा पुरवणीचे त्यांनी संपादन केले होते. मृदु, लाघवी स्वभावाच्या ललिताबाईंनी सिने पत्रकारितेला गॉसिपपासून दूर ठेवून वास्तव आणि सत्याचा पुरस्कार आपल्या बातम्यांत केला.

त्यांचे अनेक अभिनेत्रींबरोबर मैत्री आणि स्नेहाचे संबंध होते. नूतन, स्मिता पाटील, माधुरी दीक्षित,रेणुका शहाणे, रेखा, दीप्ती नवल, मृणाल कुलकर्णी, प्रिया तेंडुलकर, प्रतीक्षा लोणकर आदींचा उल्लेख करावाच लागेल. त्यांची  स्मिता, स्मित, मी : स्मिता पाटील, नूतन, ‘तें’ची प्रिया प्रिया तेंडुलकर ही पुस्तके रसिकांना आवडली होती. अनेक आवृत्त्या  निघाल्या आहेत. त्यांनी ‘उजळल्या दाही दिशा’, ‘झाले मोकळे आकाश’ या दोन कादंबऱ्या लिहिल्या. सध्या त्या दीप्ती नवलचं चरित्र लिहीत होत्या. त्यांच्यामागे विधिज्ञ विनीत रणदिवे आणि मुलगी सोनल आणि तीन बहिणी हा परिवार आहे.

ही बातमी पण वाचा : सदाबहार गाण्यांचे गीतकार योगेश यांचं निधन; लतादीदींच भावनिक ट्विट


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER