योग्य वेळ येईल, वाट बघा; राष्ट्रवादी प्रवेशावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

Eknath Khadse

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र तसे झाले नाही. यावरून त्यातच खडसे यांनी मीडियाने माझ्या प्रवेशाचे मुहूर्त काढले होते. त्यामुळे ते चुकले, असे सांगतानाच योग्य वेळ येईल. वाट पाहा, असे विधान केले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आज जळगावात आले आहेत. ते एकनाथ खडसे यांची भेट घेतील. देशमुख यांनी खडसे यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना बळ मिळाले आहे.

नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे आज एकनाथ खडसे हे भाजपमधून सीमोल्लंघन करत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. एवढेच नव्हे तर खडसे यांना कृषिमंत्रिपद दिलं जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली होती.

ही बातमी पण वाचा : एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात हालचाली ; अनिल देशमुख भेटीसाठी रवाना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER