शरद पवारांची रणनीती : जळगावमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढण्यासाठी एकनाथ खडसेंपुढे प्रस्ताव ?

Sharad Pawar & Eknath Khadse

 मुंबई : भाजपमध्ये (BJP) गेल्या बऱ्याच काळापासून नाराज असणारे खडसे आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असणाऱ्या बैठकीमध्ये या मुद्द्यावर चर्चा होणार असून, त्याबाबतचा निर्णयही होणार असल्याचे म्हटले जात आहे.

इतकेच नाही तर जळगावमध्ये राष्ट्रवादीची (NCP) कमी होणारी ताकद वाढवण्यासाठी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यापुढे प्रस्ताव मांडण्यात येत असल्याची माहिती आहे .गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि खडसे यांच्यातील मतभेद समोर आहे. किंबहुना खुद्द खडसे यांनी कित्येकदा नाराजी बोलूनही दाखवली आहे.

दरम्यान, खडसे यांच्यासह त्यांची कन्या भाजपच्या खासदार रक्षा खडसे याही राष्ट्रवादीत येणार का, यावरही बैठकीत चर्चा झाल्याचं कळतं. तसेच उत्तर महाराष्ट्रातील भाजपमधील नाराज नेते, पदाधिकारी यांनाही राष्ट्रवादीत प्रवेश देऊन त्यांचं पुनर्वसन करण्यावरही चर्चा झाल्याचे बोलले जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER