सैंधव – आरोग्यास हितकर मीठ !

मीठ (Salt) आहाराचा अविभाज्य घटक. मीठाशिवाय आहारात चवच नाही. आयुर्वेदात (Ayurveda) मीठाचे प्रकार व गुण सांगितले आहेत. कोणतेही मीठ असो त्याचा उपयोग कमीच करावा. आपण व्यवहारात सैंधव (Sendha), समुद्र मीठ क्वचित प्रसंगी दुसरे विड लवण वापरतो. या सर्व मीठात वेगवेगळे गुण आहेत. त्यानुसार शरीरावर त्याचा प्रभाव दिसतो.

सैंधवाचे काय गुण आहेत ते बघूया-

सैंधव हे खाणीतून होणारे प्राप्त होणारे, सर्व प्रकारच्या मीठापैकी सैंधव कमी तीक्ष्ण, मधुर हृदयाकरीता हितकर, त्रिदोषशामक म्हणजेच वात पित्त कफ या तिन्ही दोषांना कमी करणारे, पचायला हलके, अल्पउष्ण, नेत्रांकरीता हितकर, जाठराग्नि प्रदीप्त करणार आहे.

या गुणांवरून लक्षात येईल की सैंधवमीठ सर्वतोपरी शरीराला लाभदायक आहे. चरकाचार्यांनी सुद्धा सर्व लवणांमधे (मीठप्रकार) सर्वात श्रेष्ठ सैंधव मीठ सांगितले आहेत.

सामुद्र मीठ म्हणजेच समुद्राच्या पाण्यापासून बनविलेले मीठ पचायला जड, कफदोष वाढविणारा आहे.

பழமைவாய்ந்த இந்துப்புவின் அற்புத மருத்துவ குணங்கள் என்ன தெரியுமா? | Amazing benefits of Halite – Rock Salt. - Tamil BoldSkyआयुर्वेदात मीठ ज्या ज्या गोष्टीत वापरायचे आहे तिथे फक्त सैंधवाचाच उपयोग करायला सांगितले आहे. औषधी निर्माण असो किंवा आहार निर्माण असो तसेच पंचकर्म चिकित्सेत सैंधवाचा उपयोग केला जातो.

पोटात वायू धरणे पोट वायुमुळे फुगणे अशा तक्रारींवर सैंधवाचा खूप चांगला उपयोग होतो. हिंग्वाष्टक चूर्ण जे या तक्रारींवर वापरण्यात येते त्यात सैंधवाचा वापर करण्यात येतो.

मीठ हे सूक्ष्मगामी म्हणजे औषधांना त्या अवयवापर्यंत पोहचविण्याचे काम करणारे आहे. म्हणूनच सांधेदुखी असल्यास मालीश करतांना त्या तेलात थोडे सैंधव मीठ घालावे. सैंधव दोष कमी करणारे व सूक्ष्म गामी असे दोन्ही कार्य करते व सांधेदुखी कमी होण्यास मदत करते.

आयुर्वेदात अनेक अर्श, त्वचाविकार, श्वेतकुष्ठावरील लेपांमधे सुद्धा सैंधवाचा वापर करण्यात आला आहे.

प्रतिश्याय, सतत नाक वाहणे याकरीता सुद्धा सैंधवा सह औषधीचूर्णाचा उपयोग करण्यात येतो. सर्दीमुळे नाक बंद झाले असेल, सायनसचा त्रास असल्यास नस्य करतांना सैंधव व वचा अशा चूर्णाचा तपकीरी प्रमाणे उपयोग केला जातो. ज्यामुळे कफ पातळ होऊन बंद नाक उघडते सायनसचा त्रास कमी होतो.

कफामुळे गळा खवखवत असेल तर मीठाच्या पाण्याच्या गुळण्या करतात. यात महत्त्वाचे म्हणजे सैंधवाचाच वापर करण्यात यावा.

बीपी वाढला असेल, हृदय रोगांमधे सहसा मीठ आपण बंद करतो परंतु सैंधव मात्र हृदयाला हितकर सांगितले आहे म्हणून या रोगांमधे सामुद्र मीठ बंद करून सैंधव मीठ वापरावे.

प्रमेह मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी समुद्र मीठाऐवजी सैंधव वापरावे. कफ कमी होऊन वजन कमी होण्याकरीता सैंधवाचा उपयोग चांगला होतो.

अर्श (मूळव्याध), पोटाचे विकार पोट फुगणे अशा तक्रारींकरीता सैंधव जीरे युक्त ताक खूप फलदायी ठरते. पाचन सुधारून वायू अधोमार्गाने बाहेर पडतो.

असे हे सैंधव नित्य आहारात घेण्यायोग्य आरोग्याला हितकारी. म्हणूनच चरक ऋषी म्हणतात – सैन्धवं लवणानां श्रेष्ठ : ।

ayurveda

 

 

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER