मुंबई मनपा : शिवसेनेला सत्तेत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस वाटेकरी नकोत

Mahavikas Aghadi & BMC

मुंबई :- राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी या तीन पक्षांचे आघाडी सरकार आहे. मात्र, मुंबई महापालिकेत शिवसेना सत्ता वाटून घेण्यास फारशी तयार नाही. मागील वर्षी शिवसेना भाजपसोबत सत्तेत होती. मात्र, यंदा भाजप-शिवसेना युती तुटल्यानंतर आता महापालिकेत शिवसेनेला बहुमत नाही.

त्यातच शिवसेनेला (Shivsena) मुंबई महापालिकेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी सत्तेत वाटेकरी नको आहेत. तर, मुंबई महापालिकेत दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष असलेल्या भाजपने विरोधी पक्षात बसण्याची घोषणा केली आहे. महत्त्वपूर्ण नागरी समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी होणार आहे. यामध्ये सत्ताधारी सेना, भाजप आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे, महाविकास आघाडीचे नेते २०२२ मध्ये एकत्रित नागरी निवडणुका लढविण्याच्या शक्यतेवर चर्चा करीत आहेत.

त्यातच इतकी वर्षे मुंबई (Mumbai) महापालिकेत सत्ता गाजवणा-या शिवसेनेला महापालिकेत सत्तेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी वाटेकरी नको आहेत. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता राहिली आहे. त्यामुळे देशातील सर्वांत श्रीमंत महापालिकेवरचे आपले वर्चस्व शिवसेनेला कमी होऊ द्यायचे नाही. सर्व समित्यांसाठी उमेदवार उभे करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. महापालिकेच्या २२७ सदस्यांमध्ये शिवसेनेचे ९७ प्रतिनिधी आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER