भाजपाने स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारत रत्न’ देण्याची हिम्मत दाखवावी – संजय राऊत यांचे आव्हान

Sanjay Raut & PM Modi

मुंबई : शिवसेना आणि भाजपामध्ये हिंदुत्वावरून सुरू असलेल्या श्रेयाच्या वादात शिवसेनेचे (Shivsena) प्रवक्ते खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपाला (BJP) आव्हान दिले की, नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सरकार हिंदुत्ववादी वीर सावरकरांना भारत रत्न का देत नाही? राऊत म्हणाले की, सावरकरांबाबतच्या आमच्या भूमिकेत काहीही बदल झालेला नाही. जेव्हा-जेव्हा सावरकरांचा अवमान करणारी वक्तव्ये करण्यात आली तेव्हा शिवसेना सावरकरांच्या समर्थनात उतरली.

देशात भाजपाचे सरकार येऊन सहा वर्ष झालीत तरी सावरकरांना भारत रत्न का देण्यात आले नाही? भाजपाचे प्रवक्ते राम कदम यांनी ट्विट करून विचारले होते की, दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकरांबाबत गौरवोद्गार का काढले नाहींत? त्याला राऊत यांनी उत्तर दिले व सांगितले की सावरकरांबाबतच्या आमच्या भूमिकेत काहीही बदल झालेला नाही.

रविवारी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात भाजपाच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, शिवसेनेच्या हिंदुत्वावर टीका करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की, केवळ मंदिरात घंटा बडवणे हे आमचे हिंदुत्व नाही. भाजपाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून हिंदुत्व शिकावे, असा टोमणाही त्यांनी मारला.

या महिन्याच्या प्रारंभी मंदिर खुली करण्याच्या विषयावर राज्यपाल,कोशियारी यांनी ठाकरेंना ‘धरनिरपेक्ष’ झाल्याचा टोमणा मारला होता. त्यावर ठाकरे यांनी, कोशियारी यांना – आम्हाला तुमच्याकडून हिंदुत्वाचे प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही असे ठणकावले होते.

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर दिसेंबर महिन्यात राहुल गांधी यांनी सावरकरांवर टीका केल्यानंतर संजय राऊत यांनी राहुल गांधी याना उत्तर दिले होते – हिंदुत्ववादी विचारसरणी ही केवळ महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी देवतुल्य आहे, त्याबाबत तडजोड होऊ शकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER