अर्धावभेदक – migraine आयुर्वेद विचार

migraine

अर्धावभेदक म्हणजेच डोक्याच्या अर्ध्या भागाला तीव्र वेदना निर्माण होतात. कधी कधी मान भुवई शंखप्रदेश कान नेत्र व कपाळाचा अर्धा भाग तीव्र वेदनेने ग्रस्त होतो. शस्त्राने प्रहार करते आहे किंवा डोके गच्च पकडले आहे असे रुग्णास जाणीव होत असते. हा त्रास अति वाढला किंवा चिकित्सा केली नाही की नाक कान या ज्ञानेंद्रीयांची कार्य शक्ती कमी होते. अनेक व्यक्ती या आजाराने बेजार झालेल्या असतात.

अर्धावभेदक हा व्याधी कशामुळे निर्माण होऊ शकतो याची कारणे आयुर्वेदात (Ayurveda) दिली आहेत.

कोरडे अन्न खाणे – त्यामुळे वात वाढतो म्हणूनच वेफर्स फरसाण पॅकेट फूड हे सतत अधिक मात्रेत खाणाऱ्यांना हा त्रास होऊ शकतो. पोळीला तेल तूप न लावता खाणे. कोरडी भाजी फुलका असाच आहार असणे वात वाढण्यास कारणीभूत ठरतो.

  • भूक नसतांना जेवणे किंवा अति मात्रेत जेवण करणे. वारंवार खात राहणे.
  • शिळे अन्न खाणे.
  • पूर्ण झोप न घेणे. थकवा असणे.
  • थंड पेय फ्रीजमधील पाण्याचा वापर करणे.
  • थंड वातावरणात सतत राहणे. सतत एसी चा वापर.
  • अति व्यायाम हे सुद्धा अर्धावभेदकचे एक कारण सांगितले आहे.

अशी विविध कारणे शरीरातील वात कफ या दोषांचे संतुलन बिघडवितात. हळूहळू हा आजार निर्माण होतो.

साधारण किशोरावस्था किंवा तरुण मध्यम वयातील लोकांना हा त्रास जास्त दिसून येतो. चिकित्सा करतांना मूळ कारणाचा शोध घेऊन त्यानुसार चिकित्सा करावी लागते. नस्य ( नाकात औषधी घालणे) पंचकर्म, लेप लावणे या चिकित्सा उपयोगी ठरतात.

आहारात मनुका, जुने तूप, यव, मूगदाळ, पडवळ, बथुआ, शेवगा घेणे. ओले नारळ, डाळींब, द्राक्ष घेणे फायदेशीर ठरते.

पोट साफ ठेवणे. बद्धकोष्ठता असल्यास त्रिफळा चूर्ण, हिरड्याचे चूर्ण घेणे उपयोगी आहे. योग प्राणायाम करणे. योग्य प्रमाणात झोप घेणे गरजेचे ठरते.

ह्या बातम्या पान वाचा :

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER