रत्नागिरी एमआयडीसी कार्यालयावर जप्तीची कारवाई; जप्तीची माहिती असूनदेखील अधिकारी गाफील

midc

रत्नागिरी/प्रतिनिधी: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या रत्नागिरी कार्यालयावर आज जप्तीची कारवाई करण्यात आली असून ही नामुष्की ओढवणार याची कल्पना असूनदेखील अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यकारी अभियंता विभागाच्या रत्नागिरी कार्यालयावर काही वेळापूर्वी जप्तीची कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान कार्यालयातील संगणक, खुर्च्या, टेबल व इतर सामान जप्त करण्यात आले आहे. १९९३/९४ साली प्रस्तावित करण्यात आलेल्या निवळी आद्योगिक क्षेत्रातील बंधाऱ्याच्या कामामुळे आज ही कारवाई करण्यात आली. बंधाऱ्याच्या कामाचा ठेका दिल्यावर त्याचे अर्धे काम झाले आणि कालांतराने निवळी औद्यगिक क्षेत्र रद्द करण्यात आले. यामुळे ठेकेदार कोळवलकर गुप्ते यांचे आर्थिक नुकसान झालेे.

‘कंबाला’ निशांतने मोडला श्रीनिवासचा विक्रम

याबाबत त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. याचे निकाल लाागून सुुमारे ४ कोटी रुपये भरण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. एमआयडीसी कार्यालयाकडून १० फेब्रुवारीला पैसे भरतो असे देखील सांगण्यात आले होते. मात्र सबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. शिवाय वरिष्ठ कार्यालयातून कोणतीही मदत न मागितल्याने आज एमआयडीसी कार्यालयावर ही नामुष्की ओढवल्याचे बोलले जात आहे. जप्तीचे येणारे संकट माहीत असतानादेखील त्याकडे दुर्लक्ष करून कोणतीही तरतूद न करता आज रत्नागिरी जिल्ह्याच्या आढावा बैठकीसाठी अधिकारी सिंधुदुर्गात रवाना झाले.