वैद्यकीय सुविधांबाबत अफवा पसरवणाऱ्यांची संपत्ती जप्त करा, मुख्यमंत्री योगींचे आदेश

CM Yogi Adityanath

लखनौ : देशात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दररोज लाखांच्या संख्येत नवीन करोनाबाधित रूग्ण आढळून येत आहे. परिणामी रूग्णालयांमध्ये बेड,ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स, रेमडेसिविर इंजेक्शनसह लसींचा तुटवाडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांकडून केंद्रकाडे वारंवार मदत मागितली जात आहे. मात्र उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना एक विशेष आदेश दिला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथा यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोशल मीडियावर वैद्यकीय सुविधांबाबत फेक न्यूज व अफवा पसरवून वातावरण खराब करणाऱ्यांची संपत्तीज जप्त करा आणि राष्ट्रीय सुरक्षा अधिनियमांतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. द हिंदू ने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री आदित्यानात यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या एक उच्चस्तरीय बैठकीत, औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर व अफवा पसरवून वातावरण बिघडवण्यांचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात एनएसए आणि गँगस्टर कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, राज्यातील कुठल्याही कोविड रूग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला नाही. समस्या काळाबाजार आणि साठेबाजीची आहे, ज्या विरोधात कडक कारवाई केली जाईल. आम्ही आयआयटी कानपूर, आयआयएम लखनऊ आणि आयआयटी बीएचयू सोबत मिळून ऑक्सिजनचे एक ऑडिट करणार आहोत, जेणेकरून त्याची व्यवस्थित देखरेख होऊ शकेल. प्रत्येक बाधित व्यक्तीस ऑक्सिजनची गरज लागत नाही, यासंबंधी जागृती करण्यासाठी माध्यमांकडून सहकार्याची अपेक्षा आहे, असे मत योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button