वैभव मांगले..  उत्तम कलाकार व्हाया उत्तम माणूस 

Vaibhav Mangle

लॉकडाऊन मुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात याचा फटका अगदी सामान्य माणसांपासून कलाकार मंडळी ना सुद्धा बसला.अनेक ठिकाणी अनलॉक सुरू झालं असलं तरी अद्याप नाट्यगृह आणि थिएटर सुरू झाले नाहीयेत. रंग मंच कर्मचाऱ्यासाठी एक अभिनेता पुढे सरसावला आहे आणि त्याने आपल्या चित्रामधून चक्क ७० हजार उभे करून ही रक्कम रंग मंच कर्मचाऱ्यांना दिली आहे. लॉक डाऊन च्या काळात अभिनेता वैभव मांगले यांनी आपल्या कलाकृती मधून अफलातून चित्र रेखाटली आणि या चित्रांची विक्री करून यातून आलेली रक्कम त्यांनी रंगमंच कामगारांना दिली आहे. वैभव मांगले यांनी आतापर्यंत बारा गरजू कामगारांना मदत करून सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न केला आहे.

लॉकडाऊन काळात नाट्यगृह बंद आहेत तर अनेक गरजू रंगमंच कामगारांना त्यांचे संसार चालू ठेवण्यासाठी वैभव मांगले (Vaibhav Mangle) यांनी पुढाकार घेऊन त्यांना आपल्या चित्रांची विक्री करून यातून पैसे उभे करून या गरजू कामगारांना मदतीचा हात दिला आहे. मराठीत इंडस्ट्रीत प्रत्येक कलाकार हा आपल्या कलेच्या सोबत सामाजिक भान ठेवून काम करत असतो. अभिनेते वैभव मांगले यांच्या कामाचं कौतुक कराव तेवढं कमी आहे म्हणून मराठी इंडस्ट्रीमधल्या एका खास कलाकारांने वैभव मांगले यांच्यासाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट देखील लिहिली आहे. बघूया कोण आहे हा कलाकार …..

चला हवा येऊ द्या मधून आपल्या सगळ्यांना पोटधरून हसवणारा अभिनेता कुशल बद्रिके (kushal badrike) याने आपल्या मित्राचं कौतुक करण्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. कुशल आपल्या पोस्ट मध्ये म्हणतो ” एखाद्या उत्तम कलाकारा पेक्षा त्याच्यातला माणुस जेव्हां मोठा होतो ना, तेव्हां जगातल्या चांगुलपणावरचा विश्वास ठाम होत जातो”. आपल्या विनोदी व्यक्तिरेखांमधून लोकांना हसवणारा, काही भुमीकां मुळे व्हिलन वाटणारा, आणी थोडंसं स्पष्ट बोलल्यामुळे बदनाम असणारा, आमचा मित्र वैभव मांगले, हे त्यातलंच एक उदाहरण. कीप इट अप वैभव ” नेहमीच आपल्या मित्रांना प्रोत्साहन देऊन त्यांचा कामाचं कौतुक अनेक कलाकार मंडळी करत असतात.

आपल्या मित्राचं एवढं दिलखुलास पणे कौतुक करत कुशल ने वैभव मांगले यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मराठीत प्रत्येक कलाकार हा आपल्या सहकलाकारच नेहमीच कौतुक करत असतो त्याला नव्या कामासाठी प्रोत्साहन देत असतो. असं प्रोत्साहन देऊन त्या कलाकारांला पाठींबा मिळतो आणि काम जोमात सुरू राहत.

वैभव मांगले यांच्या कामाला तोड नाही ते उत्तम कलाकार आहेत पण त्याहून ते एक अफलातून माणूस आहेत हे त्यांनी दाखवून दिलंय. आपल्याकडे असलेल्या कलेचा वापर करत त्यांनी सुरेख चित्र रेखाटली आहेत फक्त इथवर न थांबता पुढे या चित्रांची विक्री करून यातून एवढी मोठी रक्कम उभी केली. ही सगळी रक्कम त्यांनी आपल्या रंगमंच कामगारांना मदत म्हणून दिली आहे. नाटकांचे प्रयोग बंद असल्याने रंगकर्मी वर खूप मोठं संकट आलंय त्यांना या संकटरुपी काळात मदत म्हणून आपण कुठेतरी पुढे येऊन त्यांना मदतीचा हात देऊ या विचारांतून वैभव मांगले यांनी चित्रांची संकल्पना राबवली.

रंगमंच कामगारांना नाट्य परिषद तसंच काही कलाकार त्यांच्या परीनं मदत देऊ करत आहेत. अभिनेता वैभव मांगलेनंही आपल्या चित्रांच्या माध्यमातून त्यांना सहाय्य करायचं ठरवलं. आपल्या चित्रांची विक्री करून त्यातून येणारी रक्कम गरजू रंगकर्मींना देण्याचा निर्णय घेतला होता. या चित्रांच्या विक्रीतून सत्तर हजार रुपये उभे राहिले आहेत. वैभव याविषयी म्हणाला, की ‘पाश्चात्य संस्कृतीसारखी, घरामध्ये विविध चित्रं लावण्याची पद्धत अद्याप आपल्याकडे फारशी दिसत नाही. पण, मला खूप छान वाटतंय, की लोकं स्वतःहून पुढे येऊन माझी चित्रं विकत घेताहेत. चित्रांनी घराचं सौंदर्य अधिक वाढू शकतं, ही भावना माझ्या चित्रांमुळे कुठेतरी रूजते आहे आणि यामुळे चित्रकारांची चित्रं लोकं विकत घेतील याचा आनंद आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER