शिवसैनिकांची तयारी पाहून हल्ला करण्यासाठी आलेले ‘वेदिका’चे गुंड पळाले !

Maharashtra Today

बेळगाव : कर्नाटकातील मराठी भाषिक सीमाभागात काही दिवसांपूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनानंतर कन्नड रक्षण वेदिकाच्या (करवे ) च्या गुंडांनी हल्ला केला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेना कार्यालयावर हल्ला करण्याची योजना आखली होती. पण, आधीच्या हल्ल्यानंतर सतर्क झालेल्या शिवसैनिकांनी यॊग्य तयारी केल्याने हल्ला करण्यासाठी आलेले वेदिकेचे गुंडे (goons of ‘Vedika’) पळून गेले.

‘करवे’चा म्होरक्या प्रवीण शेट्टी सुमारे शंभर कार्यकर्त्यांना घेऊन बेळगावात आला होता. राणी चन्नम्मा चौकात ठिय्या आंदोलन करून पोलिसांना वेठीस धरण्याचा त्याने प्रयत्न केला.

गेल्या वेळी पोलिसांच्या उपस्थितीत करवेच्या गुंडांनी शिवसेना जिल्हाप्रमुखांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे केवळ पोलिसांवर विसंबून न राहता, पुनरावृत्तीची शक्यता गृहीत धरून शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी कार्यालयासमोर जागता पहारा ठेवला होता. शिवसैनिक कार्यालयापासून काही अंतरावर ‘जशास तसे’ उत्तर देण्यासाठी तयारीत होते.

‘करवे’च्या गुंडांनी शिवसैनिकांना तयारीत पाहिले पळून गेले. दरम्यान, शिवसैनिकांची पाहून कानडी पोलिसांनीही शिवसेना कार्यालयाला संरक्षण दिले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER