
दिल्ली : बालाकोट ‘एअर स्ट्राइक’ला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या एअर स्ट्राइकनंतर ‘डॉगफाइट’ आणि पडद्यामागे घडलेल्या घटनांची नवीन माहिती समोर आली आहे. या एअर स्ट्राइकच्या दुसऱ्याच दिवशी भारत आणि पाकिस्तानच्या फायटर विमानांमध्ये काश्मीरमध्ये डॉगफाइट झाली होती. त्यात विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी मिग-२१ बायसनमधून पाकिस्तानचे F-16 विमान पाडले.
त्यावेळी पाकिस्तानच्या मिसाइलने अभिनंदन यांचे मिग-२१ विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले. पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागलेल्या वर्थमान यांचे रक्तबंबाळ अवस्थेतील काही फोटो पाकिस्तानी सैन्याने व्हायरल केले होते. हे फोटो पाहिल्यानंतर पंतप्रधान मोदी संतप्त झालेवर व त्यांनी थेट ‘रॉ’ च्या प्रमुखांना काही सूचना केल्या.
मोदींच्या संदेशातून त्यावेळच्या तत्कालिन ‘रॉ’ प्रमुखांनी लगेच समकक्ष आयएसआयच्या प्रमुखांना फोन केला व मोदींचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवला. आमच्या वैमानिकाला थोडीशी जरी इजा पोहोचली, तर त्याचे पाकिस्तानला गंभीर परिणाम भोगावे लागतील. पडद्यामागे त्यावेळी जे घडले, त्यामुळेच इम्रान खान यांना लगेचच भारतीय वैमानिकाची सुटका करावी लागली, असे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.
आम्ही शस्त्रास्त्रांचा ताफा दिवाळीसाठी ठेवलेला नाही, असा संदेश मोदींनी दिला होता. अभिनंदन सुखरुप माघारी परतले पाहिजेत, त्यांना हात लागला तर सर्वस्वी सगळी जबाबदारी पाकिस्तानची असेल, असे तत्कालिन रॉ प्रमुख अनिल धस्माना यांनी आयएसआय प्रमुखांना सांगितले. रॉ चीफच्या त्या आवेशाने ISI च्या प्रमुखांनाही धक्का बसला होता. आपल्या संदेशमागची सज्जता दाखवण्यासाठी राजस्थान सेक्टरमध्ये सैन्याला पृथ्वी क्षेपणास्त्र सज्ज ठेवण्यास सांगण्यात आली होती. भारताच्या या आक्रमक भूमिकेमुळे अमेरिकेची सुद्धा चिंता वाढली होती.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला