बघा तुमचं वजन वापरून काही मिळतं का?; मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला आव्हाडांचे प्रत्युत्तर

Maharashtra Today

मुंबई : राज्यातील करोना रुग्णसंख्या वाढत चालल्याने काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. कोरोना रुग्णसंख्या कायम वाढत राहिल्यास दोन दिवसात संपूर्ण लॉकडाउनचा निर्णय घेऊ, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या इशाऱ्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टीका केली. तसेच काही देशातील उदाहरणही दिली. फडणवीसांनी दिलेल्या उत्तराला राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे (Jitendra Awahad responds to criticism of CM Thackeray). फडणवीसांनी दिलेल्या सल्ल्यावरून त्यांनी टोलाही लगावला आहे.

फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad )यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आव्हाड यांनी फडणवीसांचा मुद्दा खोडून काढतानाच केंद्र सरकारवरही निशाणा साधला. “…पण हे सगळं तिथल्या केंद्र सरकारनी केलं आहे. आपलं केंद्र सरकार काय देणार? अजून राज्याचे हक्काचे पैसे देत नाहीत. बघा काही मिळते का तुमचे वजन वापरून…,” असं म्हणत आव्हाडांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

ही बातमी पण वाचा : ‘होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोतच आणि पुन्हा उतरु’ – फडणवीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button