जेव्हा खासदार संभाजीराजेंना प्रवेशद्वारावर रोखतात….

Sambhajiraje

मुंबई : खासदार संभाजीराजे यांना आज गुरुवारी मुंबई विधान भवनाच्या प्रवेशाद्वारावर वेगळाच अनुभव आला. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले खासदार संभाजीराजे यांना खासदार या नात्याने विधान भवनाच्या प्रवेशाद्वारातून आजवर सहज प्रवेश मिळत होता. मात्र, आज गुरुवारी त्यांना प्रवेशपत्राच्या घोळामुळे १५ मिनिटे ताटकळत उभे राहावे लागले. त्यांच्या सहकार्‍यांजवळ प्रवेशपत्र नसल्याने सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखून धरले.

दिल्ली हिंसाचाराचे ‘युनो’त पडसाद

सध्या मुंबईत विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, खा. संभाजीराजे एका कामानिमत्त आले असता, हा प्रकार घडला. वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्यांना आणि सहकार्‍यांना नंतर प्रवेशपत्रिका उपलब्ध करून दिल्यावरच प्रवेश मिळाला.

दरम्यान, संबंधित सुरक्षा रक्षकांचे आणि विधान भवनातील सुरक्षाव्यवस्थेची संभाजीराजे यांनी प्रशंसा केली आहे. सर्व आमदार आणि खासदारांनी सुरक्षाव्यवस्थेचे पालन केले पाहिजे, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.