हिवाळी अधिवेशनासाठी विधिमंडळ अधिकारी नागपुरात

नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. यासाठी विधिमंडळ अधिकारी नागपुरात आज गुरुवारी दाखल झालेत. ६ डिसेंबरपासून विधिमंडळ सचिवालय कामकाजास सुरुवात करणार आहे.

नागभवन आणि रविभवन येथील मंत्र्यांचे बंगले सज्ज आहेत. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा असल्याने या पाट्यांवर नाव कुणाचे लिहावे, असा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांसाठी शासकीय निवासस्थान ‘रामगिरी’ असून, उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान अशी ओळख असलेला ‘देवगिरी’ बंगला मात्र कुणाच्या वाट्याला येतो याची उत्सुकता आहे.

दरम्यान, नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या एकूणच तयारीसंदर्भात विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज एका बैठकीत आढावा घेतला.