मनसे आणि शिवसेनेत मध्यरात्री गुप्त बैठक ; उलट -सुलट चर्चांना उधाण

Uddhav Thackeray-Raj Thackeray

मुंबई : मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) आणि शिवसेना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्यात गुप्त बैठक झाली असल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर मनसे (MNS) आणि शिवसेनेत (Shivsena) काय चर्चा झाली यासंदर्भात कोणतीही माहिती समोर आली आहे .

राज्यात कोरोनाचे संकट आहे. यापार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या झाडत आहे . कोरोना काळात अनेक मागण्यांसाठी मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला . यावेळी वारंवार शिवसेनेवर आणि ठाकरे सरकारवर मनसेकडून निशाणा साधण्यात आला. पण आता रात्री झालेल्या या बैठकीमुळे राजकीय चर्चा रंगल्या आहेत. बाळा नांदगावकर आणि शिवसेना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यात रब्बरवाला हाऊस इथं ही बैठक पार पडली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ही बातमी पण वाचा :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER