आजी-माजी गृहमंत्र्यांमध्ये गुप्त बैठक, झालेल्या आरोपासंदर्भात देशमुखांनी भेट घेतल्याची चर्चा

Maharashtra Today

नागपूर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग(Parambir Singh) यांनी केलेल्या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशातच नागपुरात गृहमंत्री दिलीप वळसे (Dilip Vadase)पाटील आणि अनिल देशमुख यांच्यात एक गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून, वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. वाशिम जिल्ह्यातील कार्यक्रम आटपून दिलीप वळसे पाटील नागपूरात शुक्रवारी रात्री दाखल झाले. यानंतर मध्यरात्री साधारणत: १ वाजताच्या सुमारास अनिल देशमुख हे दिलीप वळसे पाटलांच्या भेटीला त्यांच्या शासकिय निवासस्थान असलेल्या रवी भवन येथे पोहचले. जवळपास एक तास या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. या बैठकीत परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button