फडणवीस आणि राऊतांमध्ये गुप्त बैठक; राजकीय भूकंपाची चर्चा

Devendra Fadnavis & Sanjay Raut

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची गुप्त भेट झाल्याची माहिती पुढे आली आहे. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये जवळपास दोन तास चाललेल्या या बैठकीत दुपारचं जेवण दोघांनी घेतल्याची माहितीही सूत्रांकडून मिळाली आहे. या दोन तासांत राजकीय चर्चा झाली असून, ही महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची तयारी तर नाही ना? असा प्रश्नही राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

संजय राऊत हे वारंवार देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात टीका करत असतानाच ही भेट झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे. ही भेट झाली असली तरी संजय राऊत यांनी मात्र भेट झाली नसल्याचं म्हटलं आहे. मात्र देवेंद्र फडणवीसांची पांढऱ्या रंगाची गाडी या हॉटेलमधून बाहेर पडताना दिसते. दुपारी दीड ते साडेतीनपर्यंत चर्चा झाली. बंद दाराआड झालेल्या या गुप्त भेटीत नेमकं काय झालं याचा तपशील मात्र कळू शकलेला नाही.

दरम्यान, संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली नसल्याचे म्हटले आहे. मात्र, राऊत यांनी आपण हॉटेलमध्ये होतो; पण फडणवीस यांच्याशी चर्चा झाली नसल्याचं सांगितलं. फडणवीस अन्य कुणाला तरी भेटायला आले असतील तर त्याची मला माहिती नाही, असं राऊत यांनी सांगितलं. दरम्यान, राऊत यांनी फडणवीसांशी भेट झाल्याच्या वृत्ताचा इन्कार केला असला तरी पुढच्या आठवड्यात दैनिक ‘सामना’मध्ये फडणवीस यांची मुलाखत छापून येणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER