माझ्याकडे गर्दीचे रूपांतर मतांमध्ये करण्यासाठी सिक्रेट फॉर्म्युला- सुजात आंबेडकर

Secret formula for converting votes- Sujat Ambedkar

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला होणाऱ्या गर्दीने विरोधकांचे धाबे दणाणले आहे. मात्र, सभेत होणाऱ्या या गर्दीचे रूपांतर मतांमध्ये होणार का ? असा सवाल उपस्थित करत आंबेडकरांना जागा जिंकण्यात यश मिळणार नाही, असा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला. आठवले यांच्या दाव्याला प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी आव्हान केले आहे . गर्दीचे रूपांतर मतांमध्ये करण्यासाठी माझ्याकडे सिक्रेट फॉर्म्युला आहे; मात्र तो मी जगजाहीर करणार नाही, असे सुजात म्हणाले .

ही बातमी पण वाचा:- सर्व वंचितांचे आभार; आपल्या सहकार्यामुळे परिवर्तन नक्कीच होणार! – प्रकाश आंबेडकर

भाजपसुद्धा बाळासाहेब आंबेडकरांच्या उमेदवारीमुळे दबावाखाली आहे. आम्ही कुणाच्या दबावाखाली असण्याचा प्रश्नच येत नाही, असंही सुजात यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभरात सभा घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यांनी कालच सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. आंबेडकरांच्या मुंबई आणि नाशिकला झालेल्या ऐतिहासिक सभेत गर्दी सत्ताधारी आणि विरोधकांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे . एरवी मुंबईतल्या शिवाजी पार्कवर दरवर्षी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात होणाऱ्या गर्दीचे विक्रम आंबेडकरांच्या सभेने मोडून काढले, असे बोलले जात आहे. तर नाशिकला झालेल्या सभेत अफाट गर्दी बघायला मिळाली होती.