कोरोनाची दुसरी लाट : कोल्हापुरात निर्बंधाची कडक अमंलबजावणी

Kolhapur Coronavirus

कोल्हापूर : राज्यात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेची शक्यता आहे. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातही कोरोना रुग्ण संख्या वाढू लागली आहे. यामुळे यापूर्वी घातलेल्या निर्बंधाची कडक अमंलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी सांयकाळी पोलिस प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले. या निर्बंधाचे उल्लघंन करणाऱ्यांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल असेही या आदेशात स्पष्ट केले आहे.

खासगी डॉक्टरांकडे तपासणीसाठी आलेल्या रुग्णाला सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असल्यास त्याची कोरोना तपासणी करणे अनिवार्य राहील असेही या आदेशात म्हटले आहे. जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे कोरोना प्रतिबंधत्माक उपाय योजना राबविण्यास जिल्हा प्रशासनाने सुरवात केली आहे.

यापार्श्वभूमीवर यापूर्वी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात यापूर्वी लागू केलेल्या लॉकडाऊनची मुदत दि.२८ फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजेपर्यंत वाढवली आहे. या कालावधीत यापूर्वी लागू केलेले निर्बंधांची कडक अमंलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. राजकीय सभा, मोर्चे, आंदोलने , मिरवणुका, संमेलन तसेच सामाजिक व धार्मिक कार्यक्रम आयोजनास बंदी घालण्यात आली आहे. हे कार्यक्रम बंदिस्त जागेत असतील तर त्याच्या क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच प्रवेश देता येईल पण त्याकरिता पोलिस व स्थानिक प्राधिकरणाची पूर्व परवानगी घ्यावी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER