महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट; काळजी वाढली

- केंद्राचे राज्याला पत्र

Second wave of corona in Maharashtra

मुंबई :- महाराष्ट्रात कोरोनाच्या (Corona) रुग्णांची संख्या रोज वाढते आहे. आता राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे, असे निरीक्षण केंद्राने नोंदवल्याने राज्याच्या काळजीत भर पडली आहे.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांना पत्र पाठवून सतर्क केले आहे की, महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. यावर उपाययोजना करा. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सरकारने ज्या प्रकारची काळजी घेतली होती, त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी पुढे म्हटले आहे की, होम आयसोलेशनबाबत पुन्हा समीक्षा करा. टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी करा. प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णाचे २०-३० ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ करा, कंटेनमेंट झोन पुन्हा तयार करा. राज्यातील आरोग्य सुविधा पुरेशा आहेत, असे केंद्राने म्हटले आहे.

‘नाईट कर्फ्यू’ आणि ‘विकेंड लॉकडाऊन’ केल्याचा फार कमी परिणाम संसर्ग रोखण्यासाठी होतो. मुंबईत टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के तर औरंगाबादमघ्ये ३० टक्के आहे. फिल्ड स्टाफला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग समजले नाही. हे कुटुंब आणि शेजाऱ्यांपुरते मर्यादित राहिले, जिल्हा प्रशासन फारसे काळजीत दिसत नाही, असे केंद्रीय टीमचे निरीक्षण आहे, असे केंद्राने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER