बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

Bihar Elections

पाटना : बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Elections) दुसऱ्या टप्प्यासाठी आज एकूण १७ जिल्ह्यातील ९४ विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे. या टप्प्यात एकूण १,४६३ उमेदवार नशीब आजमावत असून, महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रीय जनता दल अर्थात आरजेडीचे नेते तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांचं भविष्यही आज मतदान यंत्रात बंद होणार आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, बिहार विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण १ हजार ४६३ उमेदवार रिंगणा आहेत. त्यापैकी १४३ महिला तर एक ट्रान्सजेंडर उमेदवार आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण २ कोटी ८५ लाख ५० हजार २८५ मतदार आपला हक्क बजावतील. यात १ कोटी ३५ लाख १६ हजार २७१ महिला तर ९८० ट्रान्सजेंडर मतदार आहेत.

दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील या मतदानापूर्वी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी बिहारच्या मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) एक ट्विट करत म्हटले आहे, ‘बिहार विधानसभा निवडणुकीत आज दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होईल. मी सर्व मतदारांना आवाहन करतो, की त्यांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीचा हा उत्सव यशस्वी करावा. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन करून मास्कचादेखील वापर करावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER