दुसरा एक दिवसीय सामना; भारताचा ९० धावांनी दणदणीत विजय

- मालिकेत न्यूझीलंडवर २- ० ची आघाडी

India won by 90 runs

न्यूझीलंड : माऊंट मॉन्गॅनुईमधील बे ओव्हल इथे भारत आणि न्यूझीलंड दरम्यान खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ९० धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेमध्ये २-० ची आघाडी घेतली आहे.

नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीला रोहित शर्मा आणि शिखर धवन जोडीने दमदार फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी १५०हून अधिक धावा केल्या. रोहित शर्माने ९६ चेंडुंत ८७ तर शिखर धवनने ६७ चेंडुंत ६६ धावा काढल्या. त्यानंतर विराट कोहली, अंबाती रायुडू महेंद्रसिंह धोनी यांनीही चांगली फलंदाजी केली. भारताच्या एकूण ३२४ धाव झाल्या .

न्यूझीलंडचे फलंदाज भारताच्या गोलंदाजानसमोर टिकाव धरू शकले नाहीत. कुलदीप यादवने ४५ धावात ४, भुवनेश्वर कुमार चहलने आणि शामी व केदार जाधव ने प्रत्येकी १ गडी बाद केला. न्यूझीलंडचे सर्व फलंदाज ४० षटकात २३४ धावा बाद झाले. न्यूझीलंडतर्फे सर्वाधिक ५७ धाव डाऊग ब्रासवेल याने काढल्या.