कंगना रणौतला मुंबई महापालिकेने दिला आणखी एक जबरदस्त झटका; बजावली दुसरी नोटीस

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. या वक्तव्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर बीएमसीने (BMC) कंगनाच्या खार येथील फ्लॅटमध्ये केलेल्या बेकायदा बांधकामावरून नोटीस बजावली आहे.

कंगना हिने खार येथील आपल्या फ्लॅटमध्ये बीएमसीचे नियम धाब्यावर ठेवून बांधकाम केले आहे. तिने अक्षरश: नियमांची  पायमल्ली केली आहे. दरम्यान, कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयावर बीएमसीने केलेल्या कारवाईवर २५ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

मुंबईतील खार वेस्ट येथील DB Breeze च्या (Orchid Breeze) १६ नंबर रोडवरील एका बिल्डिंगमध्ये कंगना रणौतचा एक फ्लॅट आहे. बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावर कंगना राहाते. विशेष म्हणजे पाचव्या मजल्यावर कंगनाचे एकूण तीन फ्लॅट आहेत. त्यापैकी एक फ्लॅट ७९७ स्क्वेअर फूट, दुसरा फ्लॅट ७११  स्क्वेअर फूट आणि तिसरा फ्लॅट ४५९  स्क्वेअर फूट आहे. तिन्ही फ्लॅट्स कंगनाच्या नावावर आहेत. ८ मार्च २०१३ रोजी तिन्ही फ्लॅटची रजिस्ट्री झाली होती.

कंगना हिने फ्लॅट घेतल्यानंतर पाच वर्षांनी म्हणजेच १३ मार्च २०१८ रोजी बीएमसीकडे एक तक्रार आली होती. तिने फ्लॅट्समध्ये बेकायदा बांधकाम केल्याचे तक्रारीत म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER