भारतात ‘sputnik v’ लशीची दुसरी खेप ‘उद्या’ येणार!

नवी दिल्ली :- देशात कोरोनामुळे (Coronavirus) हाहाकार माजला आहे. महाराष्ट्रासह देशाची स्थिती बिकट आहे. रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहेत. तसेच, मृत्यूचा आकाडाही दिवसेंदिवस वाढल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण (Corona Vaccine) मोहीम जलदगतीने करण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून वारंवार करण्यात आले. यासाठी सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचे जाहीर केले. काही राज्यांनी तर १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण बंद केले आहे. यातच आता रशियातून ‘स्पुतनिक व्ही’ (sputnik v) लशीची दुसरी खेप ‘उद्या’ भारतात येणार आहे. यामुळे पुन्हा एकदा लसीकरण मोहिमेला वेग येईल, असे सांगण्यात आले आहे.

‘स्पुतनिक व्ही’ लशीची पहिली खेप भारतात १ मे रोजी आली होती. आता लशीची दुसरी खेप ‘उद्या’ भारतात पोहोचणार आहे. भारतात ‘स्पुतनिक व्ही’ लशीची निर्मिती डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज करत असून भारताच्या औषध महानियंत्रकांनी या लशीस केंद्रीय औषध प्रमाणन व नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशीनुसार मान्यता दिली आहे. या औषध महानियंत्रकांनी जानेवारीत भारत बायोटेकची कोवॅक्सीन व सिरम इंस्टीट्युटची कोविशील्ड या लशींना मान्यता दिली होती. ‘स्पुतनिक व्ही’ लस आयात करण्याची परवानगी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने मागितली होती.

‘स्पुतनिक व्ही’ लस ९२% प्रभावी असल्याचे म्हटले जाते. ‘स्पुतनिक व्ही’ लस अ‍ॅस्ट्राझेनेका लसीसारखी एक व्हायरल वेक्टर लस आहे. मात्र, या लसीचे दोन्ही डोस वेगवेगळे आहेत. या डोसचे कोरोनावर दूरगामी परिणाम दिसत आहेत. या लसीला आतापर्यंत ६०हून अधिक देशांनी मान्यता दिली आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button