‘Sputnik V’ लसीची दुसरी खेप हैदराबादमध्ये पोहचली !

Second Batch Of Sputnik V

हैदराबाद : देशभरात कोरोना लसीकरण (Coronavirus Vaccination) वेगाने सुरू आहे. देशात २०२१ अखेरीस कोरोनाशी लढण्यासाठी आठ लसी सज्ज असतील, अशी माहिती केंद्र सरकारने दिली होती. सध्या देशात सीरम इन्स्टिट्यूटची ‘कोविशिल्ड’ (COVISHIELD) आणि भारत बायोटेकची ‘कोवॅक्सिन’ (COVAXIN) या दोन लसी नागरिकांना दिल्या जात आहेत. मात्र, लवकरच रशियाची ‘Sputnik V’ लस मिळण्यास सुरुवात होईल. आज ‘Sputnik V’ लसीची दुसरी खेप हैदराबादमध्ये पोहचली आहे. यापूर्वी लसीची पहिली खेप १ मे रोजी भारतात आली. १३ एप्रिलला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) ‘Sputnik V’ला आपात्कालीन वापरासाठी मान्यता दिली होती. येत्या आठवड्यात ‘Sputnik V’ लस मिळण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.

भारतातील रशियाचे राजदूत निकोले कुदाशेव म्हणाले की, “रशियाच्या तज्ज्ञांनी याबाबत घोषणा केली आहे की, ही लस कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर प्रभावी असते. सध्या लसीची किंमत ९४८ रुपये असून ५ टक्के जीएसटी प्रतिडोसच्या एमआरपीवर आहे.”

रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे सीईओ किरील दिमित्रीव यांनी सांगितले की, “रशिया भारताची ‘Sputnik V’ एक लस आहे. याचे मोठे उत्पादन भारतात केले जाईल. या वर्षी भारतात ‘Sputnik V’चे ८५ कोटींहून अधिक उत्पादन केले जाईल, अशी आमची आशा आहे. तसेच लवकरच भारतात ‘Sputnik Lite’ लस देण्याची आमची इच्छा आहे.”


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button