गादीचे वारस वेगळे आणि रक्ताचे वेगळे’ म्हणत नवाब मलिककडून संजय राऊत यांची पाठराखण

मुंबई :- उदयनराजे भोसले यांनी छत्रपतींचे वारस असल्याचे पुरावे द्यावेत, या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विधानावरून वादंग माजले असताना संजय राऊत यांच्या या विधानाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नते नवाब मलिक यांनी समर्थन देताना म्हटले आहे की, ”गादीचे वारस वेगळे आणि रक्ताचे वारस वेगळे”

नवाब मलिक मलिक म्हणाले, देशात गादीचे वारस असलेले आणि रक्ताचे नाते असलेले अनेक राजे आहेत. दरम्यान संजय राऊत यांनी उदयनराजे हे महाराजांचे महाराजांचे गादीचे वारस आहेत की रक्ताचे वारस आहेत, असा सवाल उपस्थित केला आहे. आता उदयनराजेंनी संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत, असे त्यांनी म्हटले आहे. तर उदयनराजे भोसले राज्यसभेच्या जागेसाठी लोटांगण घातल असल्याचा टोलाही मलिक यांनी लगावला आहे.

स्वत:ला छत्रपतींचे वंशज म्हणविणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, असे आव्हान उदयनराजेंना करताना संजय राऊत म्हणाले होते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातारा, कोल्हापूरच्या गादीचा आम्ही आदरच करतो. महाराजांचे नाव जिथे येते, तिथे आम्ही नतमस्तकच होतो. पण शिवाजी महाराज ही कोणाचीही मक्तेदारी नाही. स्वत:ला छत्रपतींचे वंशज म्हणविणाऱ्यांनी पुरावे द्यावेत. पुण्यात बुधवारी आयोजित एका दैनिकाच्या पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात राऊत यांची विशेष मुलाखत घेण्यात आली होती. यावेळी राऊत यांनी उदयनराजेंवर जोरदार टीका केली होती.