ऋतुनुसार पंचकर्म चिकित्सा !

पंचकर्म चिकित्सा

दिनचर्या ऋतुचर्या याचे पालन केले की शरीराचे स्वास्थ्य टिकून राहते याबाबतीत शंकाच नाही. ऋतुनुसार आहारात राहण्यात बदल ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. शरीरातील वातपित्तकफ हे त्रिदोष देखील दिवस तसेच ऋतुनुसार वाढतात वा कमी होतात. हे शरीरात सुरुच असते. आयुर्वेदात (Ayurveda) ऋतुनुसार पंचकर्म (Panchkarma) हे स्वस्थ व्यक्ती करता, स्वास्थ्य टिकवून ठेवण्या करीता तसेच वाढलेल्या दोषांना बाहेर काढण्याकरीता सांगितले आहे. दिवाळी दसरा आला की आपण घरातील कचरा अनावश्यक गोष्टी बाहेर काढतो घर स्वच्छ करतो आणि असे स्वच्छ घर मनाला प्रसन्न करणारे जाणवते हो ना ? मग शरीराचे काय ?

ऋतुचा परीणाम, चुकीच्या आहार जीवनशैलीमुळे दोषांचा समतोल जातो. ऋतु परिवर्तन झाल्याने शरीरात दोषांची वृद्धी होते ज्यामुळे रोग उत्पन्न होतात. या वाढलेल्या दोषांना बाहेर काढले नाही की हे त्रास देतात. त्याकरीता पंचकर्म करण्यास सांगितले आहे.

थंडीच्या दिवसात हेमंत शिशिर ऋतुमधे थंडी, जड तेल तूप गोड पदार्थ खाल्याने कफ जमा होण्यास सुरवात होते त्यानंतर येणाऱ्या वसंत ऋतुतील सूर्याच्या तीक्ष्ण किरणांमुळे हा साचलेला कफ पातळ होतो त्यामुळे भूक न लागणे, कफाचे रोग होण्याची शक्यता बळावते म्हणूनच वमन पंचकर्माव्दारे हा वाढलेला प्रकुपित कफ शरीराबाहेर काढला जातो. जेणेकरून कफाचे विकार होणार नाही. म्हणूनच वसंत ऋतुत वमन हे पंचकर्म करावे.

शरद ऋतुमधे सूर्याच्या तप्त किरणांमुळे पित्ताचा प्रकोप होतो म्हणूनच या ऋतुमधे गोड हलके कडू रस असलेल पदार्थ घ्यावे तसेच विरेचन व रक्तमोक्षण या पंचकर्माचा अवलंब करून शरीरातील प्रकुपित पित्त बाहेर काढले जाते. रक्त विकार पित्तविकार यामुळे होत नाहीत.

उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर किरणांमुळे शरीरात रुक्षता निर्माण होते. हळुहळू वात वाढण्यास सुरवात होते त्यानंतर येणाऱ्या वर्षा ऋतुत वातप्रकोप होऊन वेगवेगळे वाताचे विकार निर्माण होतात त्यामुळे वर्षा ऋतु मधे बस्ति कर्म करण्यास सांगितले आहे.

स्वास्थ्यरक्षण हे आद्य कर्तव्य आहे. ऋतुच्या बदलांचा होणारा परीणाम व्याधी निर्माण करू नये त्याकरीता आहारात बदल पंचकर्म चिकित्सा उपयोगी ठरतात. याला स्वस्थ शरीराची सर्व्हिसिंग म्हणता येईल. आयुष्याची घोडदौड चांगली स्वस्थपणे होण्याकरीता हे आवश्यक आहे.

ह्या बातम्या पण वाचा :

 

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER