सर्चइंजिन वरून Apple आणि Google मध्ये होणार स्पर्धा

Search engine competition between Apple and Google

न्यूयॉर्क : फायनान्शियल टाईम्सच्या वृत्तानुसार Apple ने स्वतःचे सर्च इंजिनवर सुरू करण्यावर भर दिला आहे. Apple आपले सर्च इंजिन किती काळात लाँच करेल हे अद्याप समजू शकलेले नाही. तथापि, जेव्हा येईल तेव्हा थेट स्पर्धा Google शी राहील. जगभरात सुमारे 90 टक्के लोक ऑनलाइन शोधासाठी गुगल वापरतात. इतर बऱ्याच कंपन्यांनी गुगल सर्चशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला, पण यश मिळालेले नाही.

Apple गुगलवरील आरोप लक्षात घेऊन हे पाऊल उचलत आहे. वास्तविक, सर्च इंजिनच्या दुरुपयोगाबद्दल दिग्गज टेक कंपनी गुगलची चौकशी सुरू आहे. अशा परिस्थितीत Google ला आपली भागीदारी संपुष्टात आणावी लागण्याची शक्यता आहे.

अहवालानुसार Apple ने सर्च इंजिनच्या विकासाशी संबंधित लोकांना कामावर ठेवले आहे. त्यातील काही गूगलचे माजी कर्मचारीही आहेत. याव्यतिरिक्त, Apple या संदर्भात काही नवीन भरती देखील करीत आहे. फायनान्शियल टाईम्सला Applebot संबंधित माहिती मिळाली आहे. हा एक वेब क्रॉलर आहे. जो मोठ्या प्रमाणात इंटरनेट डेटा संकलित करतो. अलीकडे Apple ने आयफोन युझर्ससाठी सर्च करण्यामध्येही काही बदल केले आहेत. आता वेबसर्च दरम्यान, प्रारंभिक रिझल्ट Appele कडून येतो, पण गूगलकडून नाही. हे केवळ iOS 14 मध्ये घडत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER