शॉन कॉनेरी काळाच्या पडद्याआड

Sir Sean Connery

रुपेरी पडद्यावर जेम्स बाँडची (James Bond) व्यक्तिरेखा अजरामर करणारे अभिनेते सर शॉन कॉनरी (Sir Sean Connery) यांचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. ते ९० वर्षांचे होते.

मूळचे स्कॉटलँडचे असलेले शॉन कॉनरी यांची चित्रपटातील जेम्स बाँडची भूमिका अतिशय गाजली. पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी सलग सात चित्रपटांमध्ये जेम्स बाँड या गुप्तहेराची भूमिका केली.

त्याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांना एक ऑस्कर, दोन बाफ्टा आणि तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले होते. .

१९८८ साली त्यांना ‘द अनटचेबल्स’ चित्रपटातील आयरिश पोलिसाच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

२००० साली इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

गेल्या ऑगस्ट महिन्यातच शॉन कॉनरी यांनी वयाची ९० वर्षे पूर्ण केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER