विस्तारित समुद्रजोड रस्त्याचा अहवाल लवकरच सरकारला सादर करणार

Sea Link

मुंबई : विरार पर्यंतच्या बांद्रा – वर्सोवा विस्तारित समुद्र जोड (सी लिंक ) रस्त्याची व्यवहारिकता तपासण्याचे काम पूर्ण झाले असून याचा अहवाल लवकरच राज्य सरकारला सादर करण्यात येईल, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अभियंता अध्यक्ष शंकर धोटे यांनी दिली.

हा प्रस्तावित रास्ता वाशीच्या समुद्र किनाऱ्याजवळून विरार पर्यंत जाईल. याचा एक किलोमीटर भाग सुमुद्रावरून असेल. सुमारे दीड लाख वाहने रोज या पुलावरून वाहतूक करतील, असा अंदाज आहे. या मार्गाची लांबी ५२ किलोमीटर असून यासाठी २२ हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. २०२६ पर्यंत याचे काम पूर्ण होईल.

राष्ट्रीय पातळीवरील सुरक्षा मर्यादेपेक्षा मुंबईत हवेतील प्रदूषित कण 2.5 दुप्पट

या रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे नरिमन पॉईंट – वरळीचे काम सुरु झाले असून ते डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होईल. हा रास्ता सुरू झाल्यानंतर बांद्रा – वरळी आणि बांद्रा – वर्सोवा समुद्री मार्ग जोडले जातील आणि दक्षिण मंबईपर्यँत मोटार वाहतूक होऊ शकेल. विस्तारित रस्त्यामुळे विरार ते नरिमन पॉईंट सरळ वाहतूक सुरू होईल. सध्या या ६५ किलोमीटरच्या प्रवासासाठी तीन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. हा रास्ता खुला झाल्यावर या प्रवासासाठी सुमारे दीड तास लागेल. या रस्त्यावर बोरिवली, दहिसर, भाईंदर आणि वसई या चार ठिकाणी अंतर्गत वळण रस्ते (इंटरचेंज पॉईंट) राहतील.