सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटातील ‘सिटी मार’ गाणं प्रदर्शित ; सोशल मीडियावर चर्चा

Seeti Maar - Maharastra Today

मुंबई : ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच ‘सिटी मार’ या गाण्याची सर्वत्र धूम होती . आता अभिनेता सलमान खाननं (Salman Khan) हे बहुप्रतीक्षित गाणं प्रदर्शित केलं आहे.

‘सिटी मार’ सुरुवातीपासूनच या वर्षीचा सर्वांत मोठा चार्टबस्टर बनणार याची चर्चा होती. या गाण्याला कमाल खान आणि लुलिया वंतूर यांनी गायलं असून शब्बीर अहमद यांनी हे गाणं लिहिलं आहे. हा ट्रॅक म्युझिक रॉकस्टार आणि संगीतकार देवी श्री प्रसाद (डीएसपी) यांनी कंपोज केला आहे. त्यांनीच यापूर्वी सलमानसाठी सेंसेशनल हिट ‘ढिंका चिका’ हा ट्रॅक तयार केला होता.

सलमान खानची सिग्नेचर डांस स्टाइलसोबत, तरुणाईची सध्याची आवडती हॉट आणि सुंदर अभिनेत्री दिशा पटानीसोबतची त्याची जोडी, शेख जानी बाशा ज्यांना जानी मास्टर नावाने ओळखले जाते त्यांची कोरियोग्राफी आणि प्रभुदेवाच्या दिग्दर्शनाखाली तयार ‘सिटी मार’मध्ये प्रेक्षकांना आपल्या तालावर ठेका धरायला लावणारे सर्व गुण आहेत. ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटाची निर्मिती प्रभुदेवाने केली आहे. या चित्रपटात सलमान एकदम वेगळ्या अंदाजात दिसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button