‘गौ-उपचार’ पद्धतीवरील खर्च थांबविण्याची मागणी

मुंबई :- ‘गौ-उपचार’ पद्धतीवरील (काऊपॅथी) खर्च थांबविण्याची मागणी वैज्ञानिकांच्या एका गटाने केंद सरकारकडे केली आहे. ‘देशी गायीं’पासून मिळणार्‍या ‘पंचगव्या’वर संशोधन करण्यासाठी वैज्ञानिकांकडून केंद्र सरकारने संशोधन-प्रस्ताव आमंत्रित केले आहेत. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने हे प्रस्ताव मागविले आहेत.

‘१०० बिटकॉइन द्या, अन्यथा उडवून देऊ’; मुंबईतील चार पंचतारांकित हॉटेल्सना धमकीचे ई-मेल

वैज्ञानिकांना सध्या अत्यंत महत्त्वाच्या संशोधनासाठी निधीची आवश्यकता आहे. हा निधी मिळत नसताना, ‘काऊपॅथी’वर खर्च करणे, चुकीचे असल्याचे या वैज्ञानिकांनी म्हटले आहे. संबंधित वैज्ञानिकांनी हे पत्र केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे मुख्य वैज्ञानिक सल्लगार के. विजयराधवन आणि आशुतोष शर्मा यांना पाठविले आहे.

‘काऊपॅथी’ म्हणजे काय?
गायीपासून मिळणार्‍या दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण यांच्या मिश्रणास ‘पंचगव्य’ असे म्हटले जाते. या ‘पंचगव्या’च्या सहाय्याने मनुष्यावर केल्या जाणार्‍या उपचारपद्धतीला ‘गौ-उपचार’ पद्धती अर्थात ‘काऊपॅथी’ असे म्हणतात.