३० डिग्रीपेक्षा जास्त तापमानाच्या ठिकाणी कोरोनाचा धोका कमी

corona-virus

मुंबई : ३० डिग्रीपेक्षा जास्त तापमानाच्या ठिकाणी ‘कोरोना’चा व्हायरस जास्त काळ जिवंत राहू शकत नाही, असा शोध जर्मनीच्या संशोधकांनी लावला आहे.

कोरोनामुळे सध्या जगात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जर्मनीच्या संशोधकांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या विषाणूला थंडी मानवते; थंडीच्या ठिकाणी तो वेगाने वाढतो. ४ डिग्री किंवा त्यापेक्षाही कमी तापमानात हा विषाणू एका महिन्यापेक्षा जास्त काळ जिवंत राहू शकतो.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, चीनमध्ये, जिथून कोरोनाची साथ सुरू झाली त्या वुहान शहराचे तापमान ६ ते ८ डिग्री आहे. अशा ठिकाणी १५ सेकंदात हा विषाणू संक्रमित होऊ शकतो. कोरोनाच्या विषाणूला उष्ण वातावरण मानवत नाही. ३० डिग्रीपेक्षा जास्त तापमानाच्या ठिकाणी तो जास्त वेळ जिवंत राहू शकत नाही. मात्र, कोरोनाने आतापर्यंत १,६३९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६६ हजारांपेक्षा जास्त लोकांना याची लागण झाली आहे.

कोरोना विषाणू : राज्यात केवळ एक जण पुणे येथे निरीक्षणाखाली