पुण्यातील शाळा 3 जानेवारीपर्यंत बंदच : महापौर मुरलीधर मोहोळ

School Closed - Murlidhar Mohol

पुणे : शहरातील महापालिका आणि खासगी शाळा येत्या ३ जानेवारीपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला असून पाल्यांचे आरोग्य आणि पालकांचा हमीपत्रांना मिळालेला अत्यल्प प्रतिसाद या पार्श्वभूमीवर शाळा बंदचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पुणे शहरातील शाळा १४ डिसेंबरपासून सुरु होणार होत्या. मात्र महापौर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी पालक संघटना चर्चा करत आणि कोरोनाची (Corona) सद्यस्थिती लक्षात घेऊन शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे लेखी आदेशही महापालिका प्रशासनाने जारी केले आहेत. गेल्यावेळी शाळा सुरु करण्यासंदर्भात पालकांचे अवघे पाच टक्के हमीपत्र जमा झाले होते. यावेळीही हीच स्थिती पाहायला मिळत आहे.

महापौर मोहोळ म्हणाले, कोरोनाची परिस्थिती अजूनही उत्तमरीत्या नियंत्रणात आहे. मात्र असे असले तरी शाळा सुरु करण्याबाबत पालक फारसे सकारात्मक नाहीत, असे चित्र आहे. तसेच पाल्यांचे आरोग्य हाही महत्त्वाचा विषय असून याबाबत सर्व घटकांशी चर्चा करुन आपण निर्णय घेतला आहे. येत्या ३ जानेवारीच्या आधी कोरोना संसर्ग आणि इतर बाबींचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेणार आहोत’.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER